दिनेश सोनवणे
दौंड : स्वामी चिंचोली ते मलठण या रस्त्यावर शेखवस्ती नजीक असलेल्या रेल्वे लाईनवर पूल बांधण्याची मागणी शेतकरी व प्रवाशी सातत्याने करत आहेत. स्वामी चिंचोली, भिगवण,राजेगाव आणि मलठण यांच्या सीमेवरील हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने मोठी वाहतूक सातत्याने होत असते.
येथे रेल्वेलाईन असल्याने वहाने जाण्यासाठीची जागा लहान असल्याने त्यातून चारचाकी गाड्या जाणे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या पुलाची निर्मिती केल्यास भागातील हजारो नगरिकांनाचा रहदारीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे येथील रेल्वे लाईनवर उद्दान पुलाची मागणी नागरिकांनी केली आहे.
या पुलामुळे राजेगाव, मलठण, नायगाव या भागातील नागरिकांना पुणे सोलापूर महामार्गला अगदी कमी वेळात जाता येणे शक्य आहे. स्वामी चिंचोली ते वाटलूज, स्वामी चिंचोली ते राजेगाव हे रस्ते मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले आहेत.
त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटला आहे मात्र रेल्वे लाईवर उड्डाण पूल बांधन्यात यावा यासाठी राजेगावचे गटनेते मुकेश गुणवरे, माजी सरपंच स्वामी चिंचोली अझरुद्दीन शेख, वाटलूजचे सरपंच युवराज शेंडगे आदी आमदार राहुल कुल यांना या विषय माहिती देऊन या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी करणार आहेत.