पिंपरी : मुस्लिम समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष फारुक इनामदार यांनी पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात महानगरपालिका प्रशासनातर्फे कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांचे देशाप्रती आसलेल योगदान लक्षात घेता आपल्या मार्फत सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मार्गी लागावा.
सदर प्रकरण हे मुस्लिम समजाच्या भावनांशी निगडीत असल्याकारणाने स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने पिंपरी-चिंचवडमध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी फारूक इनामदार व शिष्टमंडळ यांच्यावतीने करण्यात आली.
प्रशासनाने याची दखल न घेतल्यास भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी अस्लम पठाण, सलीम खान, तौफिक खान, फिरोज शेख, शफीक चौधरी, रेहमतुल्ला चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फारुक इनामदार म्हणाले की, प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन ऊभारावे ही अनेक वर्षांपासून मुस्लीम समाजाची मागणी आहे.
तरी आजतागायत महानगरपालिकेच्या माध्यमातून कसलाही प्रतीसाद मिळालेला नाही. परंतु, त्यांचे देशाप्रती आसलेले योगदान लक्षात घेता आपल्या मार्फत सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मार्गी लागावा.