Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस सिलिंडरमागे 150 रुपयांचे कमिशन हवे; महागाईचा भडका उडणार?इंधन वितरकांनी दंड थोपटले

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 November 2026, 16:21

डॉ. अशोक बालगुडे

दिल्ली : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर आणि प्रवासाचे बजेट कोलमडले असताना आता इंधन वितरकांनी कमिशनवाढीसाठी दंड थोपटले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरमागे सध्या मिळणारे 75 रुपयांचे कमिशन थेट 120 ते 150 रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, पेट्रोलपंप चालकांनीही आपल्या कमिशनमध्ये 30 ते 40 टक्के वाढ करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का, असा प्रश्न ग्राहकांना सतावू लागला आहे.

वितरकांचा खर्च वाढला; कमिशन मात्र जैसे थे!

देशभरातील एलपीजी वितरकांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांकडे कमिशनवाढीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरमागे सध्या सुमारे 75 रुपये कमिशन मिळते. ते वाढवून 120 ते 150 रुपये करण्याची त्यांची मागणी आहे. म्हणजेच सिलिंडरमागे 45 ते 75 रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, गोदामांची देखभाल, वाहतूक आणि प्रशासकीय खर्च सातत्याने वाढत आहेत. त्यात पाइपद्वारे मिळणाऱ्या गॅसचा (पीएनजी) विस्तार आणि ई-केवायसी प्रक्रियेचा परिणामही व्यवसायावर होत असल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा आकडा वाढत असल्याने व्यवसाय चालविणे कठीण होत असल्याची त्यांची भूमिका आहे.

पेट्रोल-डिझेलवरही अतिरिक्त कमिशनचा आग्रह

पेट्रोलपंप चालकांनी एकूण कमिशनमध्ये 30 ते 40 टक्के वाढ मागितली आहे. पेट्रोलच्या प्रत्येक लिटरमागे 1.50 रुपये, तर डिझेलमागे 2,50 रुपये अतिरिक्त कमिशन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. ग्राहकांना मोफत हवा भरणे, स्वच्छतागृह, कर्मचारी वेतन, वीज आणि पंपांची देखभाल यांवरील वाढता खर्च त्यांनी पुढे केला आहे.

वितरकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत खर्च वाढला; मात्र त्या तुलनेत कमिशनमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. गेल्या दशकात सुमारे 18 कमिशनवाढीच्या फेरविचारांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरवाढीचा निर्णय अद्याप नाही!

मात्र, वितरकांनी कमिशनवाढ मागितली म्हणजे ग्राहकांसाठी गॅस सिलिंडर, पेट्रोल किंवा डिझेल लगेच महागणार, असा निष्कर्ष काढता येणार नाही. कमिशनवाढीची मागणी आणि ग्राहकांच्या विक्रीदरातील वाढ या दोन स्वतंत्र बाबी आहेत. तेल कंपन्या आणि केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतरच त्याचा ग्राहकांच्या किमतींवर काय परिणाम होईल, हे स्पष्ट होणार आहे. सध्या दरवाढीचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

वितरकांना वाढत्या खर्चाचा दिलासा हवा आहे; पण त्याची किंमत ग्राहकांच्या खिशातून वसूल होणार नाही, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे. अन्यथा कमिशनच्या वादात महागाईचा नवा हप्ता सर्वसामान्यांच्या माथी मारला जाण्याची भीती आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर १० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप? राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp