मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकताच ‘गरम धरम ढाबा’ फ्रँचायझीशी संबंधित फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि इतर दोघांविरुद्ध समन्स जारी केलं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘गरम धरम ढाबा’प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप धर्मेंद्र यांच्यावर करण्यात येत आहे. फ्रँचायझीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुकीचा आरोप आहे. धर्मेंद्र यांच्यासह आणखी दोन व्यक्तींनाही कोर्टाच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीसी कलम 506 अंतर्गंत गुन्हेगारी धमकीच्या गुन्ह्यासाठी देखील समन्स बजावण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची प्रथमदर्शनी तपासणी करणे आवश्यक आहे. 9 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मागणारा अर्ज फेटाळला होता. मात्र, न्यायालयाने तक्रारीची दखल घेत तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एप्रिल 2018 मध्ये सहआरोपींनी त्याला धरमच्या वतीने NH-24/NH-9, उत्तर प्रदेश वर ‘गरम धरम ढाबा’ची फ्रँचायझी उघडण्याची ऑफर देऊन संपर्क साधला होता. तक्रारदाराला कनॉट प्लेस, दिल्ली आणि मुर्थल, हरियाणा येथील गरम धरम ढाब्याच्या शाखांमधून सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची मासिक उलाढाल होत असल्याच्या बहाण्याने फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. तक्रारदाराला सांगितले की, गुंतवणुकीवर सात टक्के नफ्यावर 41 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, फ्रेंचाइजी सुरू करण्यासाठी संपूर्ण मदत केली जाईल, असं अश्वासनदेखील केले.
या प्रकरणी सह आरोपी आणि तक्रारदार यांच्यात अनेक ई-मेल आणि मिटिंग्सदेखील झाल्या. कनॉट प्लेसमध्ये गरम धरम ढाबाचे ब्राँच ऑफिसमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये एक मिटिंगदेखील झाली होती.