नवी दिल्ली: दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात कथित दारू घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या कविता यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने या दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली. यानंतर न्यायालयाने अरविंद केजरीवाल, के कविता आणि चरणप्रीत यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.