मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबईतील ८ ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला राज्य मंत्री मंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यास मंजुरी
मुंबई सेंट्रल चे नाव नाना जगनाथ शंकर शेठ
करीरोडचं नाव लालबाग
सँडहर्स्टचं नाव डोंगरी
मरीनलाईन्सचं नाव मुंबादेवी
डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन
चर्नीरोडचं नाव गिरगाव
कॉटनग्रीनचं नाव काळाचौकी
किंग्स सर्कलचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ