लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) येथील शिवराम रामचंद्र बोडके (वय-86) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवराम बोडके यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोडके यांचे वडील तर प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांचे ते चुलते होत.