संदीप टूले / केडगाव (दौंड) : दौंड उपविभागीय (प्रांत) कार्यालय हे विशेष बाब म्हणून या महायुतीच्या सरकारच्या काळात राहुल कुल यांनी मंजूर करून घेतले होते. या उपविभागीय (प्रांत) कार्यालयामुळे तालुक्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. त्याच बहुचर्चित स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते दौंड येथे पार पडले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, बाळासाहेब गावडे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, सुदर्शन चौधरी, हरीभाऊ ठोंबरे, दादा पाटील फराटे, प्रेमसुख कटारिया, नामदेव बारवकर, नंदू पवार आदीसह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले की, ”दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालय व्हावे यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करत होतो. या कामाला यश आले असून, दौंडच्या जनतेची परवड आता थांबणार आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे”. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आभार मानले.
राहुल कुल यांच्यासारखा आमदार मिळायला नशीब लागतं
जयकुमार गोरे या उद्घाटन प्रसंगी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, ”राहुल कुल यांच्यासारखा आमदार दौंडला मिळाले. याच्यासारखे भाग्य दौंडकरांचे दुसरे काय असू शकते. डायरेक्ट सामान्य जनतेचे फोन उचलून त्यांचे प्रश्न ऐकून घेणारा व लगेच समस्या सोडविणारा दौंडचा आमदार असा एकमेव आमदार आहे”.
राहुल कुल हे पुणे जिल्ह्याचे होतील पालकमंत्री
राहुल कुल हे आगामी काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल हे पवारांच्या बालेकिल्ल्यात निवडून येणार एकमेव आमदार आहे. तुमचा आमदार हा फक्त दौंडच्या जनतेचा विचार करतो. दौंडच्या आमदारांची ओळख फक्त पुणे-मुंबईपर्यंत नसून दिल्लीपर्यंत ओळख निर्माण केली. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राहुल कुलांना नावाने ओळखतात. त्यामुळे त्यांना कसलाही निधी आणताना कसलीही अडचण येत नाही. त्यांची कामे लगेच होतात कारण ते नेहमीच ऑनलाईन राहतात. फक्त कामांचा पाठपुरावा करतात जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत त्यांचा पिच्छा न सोडणारा हा एकमेव आमदार आहे. येत्या काळात दौंडचा आमदार हा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असेल, त्यामुळे दौंडच्या जनतेने त्यांना 70 हजारांच्या फरकाने निवडून दिलं पाहिजे.
राहुल कुल हे दौंड तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार
राहुल कुल हे दौंड तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दौंडचे आमदार हे इतक्या झपाट्याने दौंडचा विकास करत आहे की, दौंडच्या शेजारील तालुकेही कामानिमित्ताने दौंडला जोडले जातील. दौंडचे आमदार नेहमी कामात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी केले. तर आभार उमेश देवकर यांनी मानले.