Daund News : लोणी काळभोर, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी गाडीची काच फोडून मोबाईल फोन व एक बॅग चोरून नेणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Two cases of theft in Daund police station limits revealed, three arrested)
रोहित विलास तोरडमल (वय – २०, सध्या रा. भोसले वस्ती, कुरकुंभ बारामती रोड ता. दौंड, मुळ रा. कडकनाथवाडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद) रितेश सोनार, प्रतीक कृष्णा सोनवणे (वय – २१, रा. दोघेही भीमनगर ता. दौंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Daund News)
स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेची दमदार कामगिरी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ११) दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या बाहेर चारचाकी गाडी पार्क करून चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात कोणीतरी चारचाकी गाडीची काच फोडून पाठीमागील सीटवर ठेवलेली बॅग चोरून नेल्याबाबत गीता पवन कुमार (वय-३०, रा. श्री सागर सोसायटी निगडी पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Daund News) त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सदर घटनेचा पोलीस तपास करीत असतना तपासाचे अनुषंगाने कुरकुंभ एमआयडीसी येथे गस्त घालीत दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल हा रोहित तोरडमल याचेकडे असल्याची माहिती मिळाली. (Daund News)
सदर इसमाची गोपनीय बातमीदार मार्फत बातमी काढून त्यास ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्त्याने त्याचे साथीदार प्रतीक सोनवणे व रितेश सोनार दोघे राहणार कुरकुंभ एमाडिसी यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. (Daund News) त्यानुसार पोलिसांनी प्रतिक कृष्णा सोनावणे याला कुरकुंभ एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रोहित तोरडमल व रितेश सोनार यांचे सोबत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत पांढरेवाडी, कुरकुंभ एमआयडीसी परीसार्तून गुरुवारी (ता. १८) राहत्या घरातून एलसीडी टीव्ही व टेबलवर ठेवलेला मोबाईल चोरी झाल्याबाबत ऋतुराज कैलास जाधव यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती.(Daund News)
सदर घटनेचा गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना सोलापूर पुणे हायवेवर गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा मोबाईल हा प्रवीण शामराव भोसले याचे कडे असून तो दौंड शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.(Daund News) त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव प्रवीण उर्फ पप्पू शामराव भोसले वय – २९, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेतल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केला आहे. वरील तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी दौंड पोलिसांकडे सुर्पुत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन, मुकुंद कदम यांनी केली आहे. (Daund News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : पतीनेच अपहरण करून पत्नीचा केला खून, हत्या करून मृतदेह फेकला उसाच्या शेतात
Daund News : दौंड तालुक्यातील अनिता मोरे यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती
Daund News : संकटावर मात करीत वीरपत्नीने मिळवली पोलिस दलात नोकरी