गणेश सुळ
Daund News : केडगाव : शेतकरी बांधवांनी ऊस लागण नोंद वेळच्यावेळी करावी. नोंद सहजरीत्या करता यावी यासाठी सुटसुटीत पद्धती निर्माण केली आहे. तिचा वापर करावा म्हणजे ऊस तोड नियोजन करणे सोयीचे होईल. चालू हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली.
पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन झाले. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे ज्येष्ठ कर्मचारी अहर्निश परदेशी व त्यांच्या पत्नी स्वाती परदेशी यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. (Daund News) यामध्ये पांडुरंग राऊत बोलत होते.
उर्वरित एफआरपीमधील रक्कम लवकरच दिली जाणार
कारखान्याकडे १० हजार २०९ हेक्टर ऊसाची नोंद झाली असून, नोंदणी झालेल्या ऊसाचे गाळप वेळेत करता यावे. यासाठी कारखान्याने पूर्वनियोजित जोरदार तयारी केलेली आहे.(Daund News) दरम्यान, कारखान्याने मागील हंगामात गाळप केलेल्या उसाच्या एफआरपी पोटी २७०० रुपये टनाप्रमाणे रक्कम अदा केली आहे. उर्वरित एफआरपीमधील रक्कम लवकरच दिली जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
शेतकरी बांधवांनी ऊस लागण नोंद वेळच्यावेळी करावी. नोंद सहजरीत्या करता यावी यासाठी सुटसुटीत पद्धती निर्माण केली आहे. तिचा वापर करावा म्हणजे ऊस तोड नियोजन करणे सोयीचे होईल. शास्त्रशुद्ध शेती करत कमी खर्चात अधिक उत्पादन घेता यावे, यासाठी कारखान्याने पायलट योजना सुरू केली असून, या योजनेचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी केले.
यावेळी संचालक महेश करपे, किसन शिंदे, माधव राऊत, अंकुशराव ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, सरव्यवस्थापक आर. एन. यादव, आर. एस. शेवाळे, (Daund News) चिफ इंजिनिअर व्ही. व्ही. क्षीरसागर, केन मॅनेजर एस बी. टिळेकर, धन्यकुमार रणवरे, नवनाथ गाडे, संतोष रोडे, अशोक शेंडगे, दीपक रोडे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी बांधव, शेतकरी उपस्थित होते.
कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन यावे यासाठी योजना
कारखान्याने ऊस लागण यंत्र, पाचट कुट्टी मशिन, खोडकी छाटणी यंत्र, सरी फोडणी यंत्रे आदी अवजारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यायचे यासाठी कारखान्याने पायलट योजना सुरू केली आहे. याचा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
– पांडुरंग राऊत, अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्याच्या विकासासाठी कुल कुटुंबिय नेहमीच तत्पर – समाधान महाराज शर्मा