गणेश सुळ
Daund News : केडगाव, (पुणे) : देलवडी येथील वांझरवाडी येथील सेवा रस्ता ते मुख्य रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर पडलेले खड्डे गावातील तरुण शिवाजी अंकुश वांझरे यांनी रस्ते बांधणीची सर्व यंत्र सामग्री वापरून स्वखर्चातून हे खड्डे बुजविले आहेत. (DaundNews)
स्वखर्चातून सेवा रस्त्याची डागडुजी….
सुमारे गुडघाभर खोलीचे जीवघेणे असंख्य खड्डे पडले होते. अतिशय बिकट अवस्था सेवा रस्त्याची झाली होती. या रस्त्यावरून जाणारे येणारे लोक संताप व्यक्त करीत होते. हे पाहून शिवाजी वांझरे यांनी स्वखर्चातून या रस्त्याची डागडुजी केली. त्यांनी केलेल्या कामाचे सध्या कौतुक केले जात आहे. (Daund News)
देलवडी येथील वांझरवाडी परिसरात लोकसंख्या वाढली आहे. पर्यायाने रस्त्यांवरील वर्दळही कमालीची वाढली. सेवा रस्त्यातील मोठे खड्डे आणि त्यात पाणी साठल्याने जागोजागी तयार झालेली तळी रहिवाशांची मोठी डोकेदुखी ठरत होती. रात्री ये-जा करताना या असंख्य खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वारंवार अपघातहि या ठिकाणी घडले आहेत. (Daund News)
या रस्त्याबाबत कोणताही अधिकारी अथवा पुढारी यांच्याकडून याबाबत कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर या शिवाजी वांझरे याने ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. खड्ड्यात साचलेले पाणी जेसीबीच्या सहाय्याने काढून रस्ता कोरडा केला त्यात मुरूम टाकला. रोलर फिरवून रस्ता सपाट केला. (Daund News)
दरम्यान, आता प्रशासनाने रस्त्याचे काम करून ही समस्या कायमची सोडवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. या उपक्रमामध्ये अमित तनपुरे, निलेश वांझरे, सूरज कोल्हे, अण्णा वांझरे, धना ताम्हाणे, सोनू शितोळे, दिपक वांझरे, अमोल पंडित, दिगंबर जगताप, सतिश कऱ्हे आदी तरुणाचे सहकार्य लाभले.