संदीप टूले
Daund News : दौंड: केडगाव ता.दौंड येथील विज वितरण कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा चे आयोजन दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी महावितरण दापोडी केडगाव कार्यालयाच्या सह शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. (March on Mahavitaran office in Daund…)
खंडित वीजपुरवठा, नादुरुस्त रोहित्रे यामुळे नागरिक त्रस्त
महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे दौंड तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणारा विजपुरवठा, वाढते लोडशेडींग, कमी दाबाने होणारा विजपुरवठा तसेच नादुरुस्त रोहित्रांमुळे तालुक्यातील शेतकरी व व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात विजेच्या अनुषंगिक येणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Daund News) याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, ‘मी आमदार आसताना 4 सबस्टेशन आणि 2700 नविन रोहित्र बसविले आता साधे आँईल सुद्धा मिळत नाही. वेळच्या वेळी रोहित्र मिळत नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक होते.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशालीताई नागवडे, विरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार , तुषारदादा थोरात, दिलीप हंडाळ, भाऊसाहेब ढमढरे, (Daund News) विकास खळदकर, संभाजी ताकवणे,पोपटभाई ताकवणे, शिवाजी वाघोले, मोहन टुले मीनाताई धायगुडे, वंदना मोहिते यांच्या सह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : प्रती जेजुरी देलवडी येथील खंडोबा मंदिरामध्ये हापूस आंब्याची आकर्षक सजावट
Daund News : अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश
Daund News : राजा – पोपट संतराज महाराज पालखी रथाचे मानकरी