गणेश सूळ
Daund News केडगाव : लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांनी सर्व सामान्य जनतेला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला. (Daund News) दौंड तालुक्याच्या विकासासाठी कुल कुटुंबिय नेहमीच तत्पर आहे. असे गौरवद्गार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी काढले. (Daund News)
दौंड तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांच्या २२ व्या पुण्यस्मरण निमित्त राहू येथील कैलास विद्या मंदिरामध्ये ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील गौरवद्गार ह.भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी काढले.
यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, जेष्ठ नेते नंदू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ. प. समाधान महाराज शर्मा म्हणाले कि, दौंड तालुक्याच्या विकासामध्ये कुल कुटुंबियांचे बहुमूल्य योगदान असून स्वर्गीय बाबुराव कुल, स्वर्गीय आमदार सुभाष कुल यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला. मा आ. रंजना कुल व आमदार राहुल कुल यांनी तालुका विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेला आहे. असे शर्मा यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, भाजपचे तालुकाद्यक्ष माऊली ताकवणे, आनंद थोरात, महेश भागवत, हरिभाऊ ठोंबरे,बंडोपत नवले,मारुती मगर,दादासाहेब कोळपे,शरद कोळपे,किसन शिंदे, विकास शेलार, अप्पासाहेब हंडाळ,चंद्रकांत नातु, तुकाराम ताकवणे, दिलीप देशमुख,सुजाता सोनवणे,मनीषा नवले,परशुराम शिंदे, चिमाजी कुल आदी सह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राहुल टेंगले यांनी केले. तर आभार प्रकाश जगदाळे यांनी मानले.