राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अभ्यास वर्ग प्रशिक्षण शिबिर व पुणे जिल्हा मासिक बैठक चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर सभागृहात पार पडले. सकाळी दौंड तालुक्यातील ग्राहक पंचायत पहिल्या शाखेचे श पिंपळगाव येथे श्रीकांत जोशी, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर, सचिव संतोष शिर्के, पंकज बांगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ( All India Grahak Panchayat worker’s study camp at chaufula)
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन, स्वामी विवेकानंद व संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला
पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश भोंडवे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. शिबिराची सुरुवात निर्मला थोरात यांनी ग्राहक गीताने केली.
अनेक मान्यवरांनी केले मार्गदर्शन
पहिल्या सत्रामध्ये मध्य महाराष्ट्र प्रांताचे विधी व न्याय, ग्राहक मार्गदर्शक सेवा केंद्र प्रमुख श्रीकांत जोशी यांनी १९३२ पासून लागू झालेल्या कुळ कायदा या विषयावर मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. (Daund News) यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी पोलीस खात्याविषयीचे तसेच लहान मुलांना मोबाईल देताना काळजी घ्यावी. मुले मोबाईलवर काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मुली गायब होण्याचे प्रमाण वाढलेले असून पालकांनी मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी रोज चर्चा करावी अशी भावना व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी संघटनेची ध्येयधोरणे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुवर्ण महोत्सवी वर्ष याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली अडसरे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.(Daund News) जिल्हा सचिव संतोष शिर्के यांनी पोलीस यंत्रणा अधिकार व कर्तव्य, लोकाभिमुख पोलीस स्टेशन कशी असावी, पोलीस प्राधिकरण, मानवी हक्क आयोग यांच्याकडे तक्रार दाखल करणे आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रवासी समिती जिल्हा प्रमुख नितीन मिंडे यांनी कार्यकर्ता कसा घडला पाहिजे, कार्यकर्ता हा पदधारी नसून तो कार्य करणारा असावा अशी भावना व्यक्त केली. तसेच तालुक्यातील प्रत्येक शेतकरी मेळावा घेऊन शाखेचे उद्घाटन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कार्यकर्ता कसा असावा, महावितरण तक्रारी यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. (Daund News) कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव ऋषिकेश बंदिष्टी यांनी तर सूत्रसंचालन इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा महिला संघटक लता कुंभार, पुणे जिल्हा प्रसार व प्रसिद्धी प्रमुख बबन महाराज शिर्के, दौंड तालुका अध्यक्ष नामदेव त्रिंबक होले, संघटक भाऊसाहेब दुरेकर, दौंड शहर अध्यक्ष गणेश जगताप, महिला अध्यक्ष अपर्णा पंडित, महिला संघटक पद्माताई पासलकर, दौंड शहर महिला अध्यक्ष लता राठोड, अजित मापारे, कैलास कदम, रमेश लडकत, अमोल भागवत यांसह अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Daund News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबावच्या भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी
Daund News : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चोरीच्या घटना उघडकीस, तिघांना बेड्या