गणेश सुळ
Daund News : केडगाव : ‘युवकांनी व्यवसाय करत असताना उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, प्रशासकीय साक्षरता, विधी साक्षरता, अर्थ साक्षरता अशी कौशल्य आत्मसात केल्यास नक्कीच यश मिळेल’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीयचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.
वरवंड तालुका दौंड येथील एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय येथे अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबिर व अर्थसाक्षरता बॅंकिंग तज्ञ अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना शिबिराचे उद्घाटन राजेंद्र कोंढरे यांनी केले. (Daund News ) यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘युवकांनी व्यवसाय करत असताना उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, प्रशासकीय साक्षरता, विधी साक्षरता अर्थ साक्षरता अशी कौशल्य आत्मसात करावी. तसे केल्यास नक्कीच यश मिळेल’.
यावेळी उद्योजकता या विषयावर मिटकॉनचे गणेश खामगळ, व्यावसायिक अर्थसाक्षरतेवर चार्टड अकाऊंटट डी. एस. बोरकर बारामती बँकेचे वतीने त्यांचे प्रतिनिधी व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रतिनिधी खोजे यांनी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती, दौंड, इंदापूर या तालुका शाखेच्या प्रयत्नातून गेल्या 6 महिन्यात झालेल्या शिबिरातून विविध बँकांनी सुमारे 13 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. त्यांना महामंडळाकडून व्याजपरतावा मिळणार आहे.
संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष ऍड. पांडुरंग जगताप, जिल्हाध्यक्षा शैलजा दुर्गे, विक्रमबाबा पवार, नंदूनाना जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विजय दिवेकर, दादासाहेब नांदखीले, विक्रमबाबा पवार, संजय थोरात, राहुल शेळके, गणेश काकडे, अतुल आखाडे, उमेश दिवेकर, स्वप्निल घोगरे, शैलेश पवार, विकास जगदाळे या पदाधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय गायकवाड यांनी केले (Daund News ) तर सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले.
‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ काळाची गरज
बँकेतून अथवा महामंडळातून या तरूण उद्योजकांना कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्राची संख्या कमी असावी यावर भर देण्यात आला. कर्ज मिळविण्यात युवक-युवतीना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात ‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ काळाची गरज बनली आहे.
– संजय थोरात, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड तालुका
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथाचीवाडी येथील मंजूर असलेल्या ७० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन