गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात डोर्लेवाडी परिसरात दत्त मंदिरांमध्ये दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गावागावांत ‘जो जो जो जो रे सुकुमारा दत्तात्रया अवतारा’ असे पाळण्याचे सूर आसमंतात घुमत होते.
डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील मेखळी रस्त्या लगत असणाऱ्या दत्त मंदिरात परिसरातील कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित असलेले शेकडो भाविक, टाळ, मृदुंगाचा गजर करीत होते. मंदिराच्या परिसरात केलेली फुलांची सजावट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात फुलांची उधळण करीत शेकडो भाविकांच्या उपस्थित शनिवारी (ता. 14) दुपारी 12 वा. दत्त जन्म सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य सुमन तुकाराम खोत, तुकाराम खोत, दिलीपराव भोपळे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाच्या महाप्रसादचे आयोजन अनिल काळोखे, हनुमंत राऊत, संपत काळोखे, सोमनाथ नाळे (कऱ्हावागज) यांच्या काडून करण्यात आले होते.
दरम्यान, पहाटे पासून मंदिरात महाअभिषेक, पूजा करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच सूर्यवंशी महाराज मेखळी यांचे दत्त जन्माचे फुलांचे कीर्तन झाले. त्यानंतर पाळणा म्हणून नाव ठेवण्यात आले व सर्वाना सुंठवडा वाटप करण्यात आला.