राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असताना अवैधरित्या वाहतूक सुरु असल्याचे पुन्हा अनुभव आला महामार्गावरुन ट्रॅक्टरला तीन-तीन टेलर जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे.
यवत येथील पुलावरुन सोलापूर बाजूने धोकादायक पद्धतीने तीन-तीन टेलर जोडून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर धोकादायक पद्धतीने वाहतूक वारंवार होत असुन वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.
दरम्यान, ट्रॅक्टरमध्ये उसाचा अधिक भार असल्याने ट्रॅक्टरचे पुढील दोन चाके उचलून वाहतूक होत असते अश्या धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबतीत प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे