उंड्री : पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष व उंड्री (ता. हवेली) येथील दामोधर लक्ष्मण टकले (वय- ७८) यांचे नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक पै. देविदास टकले यांचे ते बंधू, माजी सरपंच सुभाष टकले यांचे चुलते, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले यांचे सासरे, तर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अविनाश टकले यांचे ते वडील होत.