पुणे : दहीहंडीच्या दिवशी यंदा राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिवांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबईत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. थरावर थर रचले जातात. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यात सहभागी होतो. प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली आहे. येत्या अठरा ऑगस्टला कृष्णजन्म आणि १९ ला गोपाळकाला आहे.
दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली. गेली दोन वर्षे कोरोनामुळं सणांवर बरीच निर्बंध होती. आता हे सण धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदा अशाप्रकारचे कुठलेही निर्बंध असणार नाहीत. परंतु, न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचं पालन कराव, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय.