सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यात खरीप पेरणीला यंदाचा पावसाळा वेळवर व पोषक झाला नाही .त्यामुळे २५ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रात तथा केवळ ७५ टक्के खरीप पेरणी झाली आहे . दि .१८ जूलैपर्यंत एकूण २१९ .२ मि.मी. पाऊस झाला आहे . तालुक्यात सर्वाधिक पेरा उडीद ११ हजार ९४४ हेक्टर क्षेत्र , सर्वात कमी तीळ केवळ ३ हेक्टर तर भात , खरीप ज्वारी व खुरासणी शून्य पेरा झाला आहे .
तालुक्यात अद्यापही दमदार मोठा पाऊस झालेला नाही .जून महिना पाऊसाने दडी मारल्याने पेरणी लांबली .जूलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. अंबट ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली .परत पुक नक्षत्राच्या थोरल्या पुकाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली .परंतू पंधरवाडा होत आला तरी संततधार भिज पाऊस सुरुच आहे . यामुळे व सुर्यप्रकाश अभावी उगवण झालेल्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे , वाढ खुंटली आहे . तसेच पिकात तनाचा जोर वाढला . यामुळे पिक रोगराईच्या कचाट्यात सापडल्याने खरीप पीकं धोक्यात आहेत .तर मशागतीसाठी ठेवलेले क्षेत्र संततधार व भिज पावसामुळे तन वाढले आहे .
दरम्यान, परंडा तालुक्यात दि .१८ जुलैपर्यंत एकूण २१९ .२ मि.मी. पाऊस झाला आहे . यामध्ये महसूल मंडळ निहाय – परंडा मंडळ – २२४ .७ , आसू मंडळ – २४७.१ , जवळा ( नि . )मंडळ- २१६ .६ , आनाळा मंडळ – २०३ .४ व सोनारी मंडळ -२०३ .४ मि.मी. पाऊस झालेला आहे .
तालुक्यात खरीप हंगामातील सरासरी ३३ हजार ६८० .२२ हेक्टर क्षेत्रामधून २५ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रात तथा ७५ .५४ टक्के पेरणी झालेली आहे. यामध्ये पिक निहाय पेरणी – बाजरी- ९२६ .७२ हे .मधील १३८ हे .( १४ .८९ टक्के )पेरणी , मका – २५०० हे .मधील १५४९ हे (६१ .९६ टक्के ) पेरणी , तुर- १०५०० हे .मधील ७१११ हे .(६७ .७२ टक्के ) पेरणी , मुग- २५०० हे .मधील ९७४ हे .३८ .(१६ टक्के ) पेरणी , उडीद – ७५०० हे . क्षेत्र असताना सरासरीपेक्षा दीडपट वाढ म्हणजे ११९४४ हे .(१५९ .२५ टक्के ) पेरणी झालेली आहे.
भुईमुग- ५२० हे .मधील १४० हे .(२६ .९२ टक्के ) पेरणी , तीळ – ३५०हे .मधील ३ हे .पेरणी, सोयाबीन – २६०० हे .क्षेत्र असताना सरासरीपेक्षा वाढ होऊन २७५९ हे .(१०६ .१२ टक्के ) पेरणी झाली आहे . सुर्यफुल- १२०० हे . मधील २८ हे .(२ .३३ टक्के ) पेरणी व कापुस ४५०० हे .मधील ३८२ हे .(८ .४९ टक्के ) पेरणी झालेली आहे .