Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News :हृदयद्रावक! प्रेमात धोका, ब्लॅकमेलिंगला कंटाळून कृषी विद्यार्थ्याची आत्महत्या; थेट पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 October 2025, 23:59
Crime News: Heartbreaking! Betrayed in love, fed up with blackmail, an agricultural student commits suicide; an emotional letter directly to Prime Minister Modi

Photo-Social Media

नागपूर: प्रेमात झालेल्या विश्वासघाताला आणि सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून नागपुरात कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या ईश्वरलाल कंवरलाल चौधरी (वय २१) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मूळचा राजस्थानच्या बाडमेर येथील रहिवासी असलेल्या ईश्वरलालने आत्महत्या करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या नावे एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यात मुलींकडून कायद्याचा गैरवापर (Crime News)होत असल्याचा गंभीर आरोप करत न्याय मिळण्याची याचना केली आहे.

नेमका प्रकार काय?

काचीपुरा चौकातील नवीन मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या ईश्वरलालचे गुंजन नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून गुंजन त्याला लग्नासाठी दबाव टाकत होती, तसेच पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. एवढेच नव्हे तर, ती वारंवार गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने ईश्वरलाल मानसिक तणावाखाली होता. अखेरीस, १ ऑक्टोबर रोजी त्याने वसतिगृहात दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासा

ईश्वरलालने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन पानी चिठ्ठीत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.त्याने पंतप्रधान मोदींना याचना केली आहे की, मुली कायद्याचा गैरफायदा घेत आहेत आणि देशात कायदा सर्वांसाठी समान असावा.

“माझ्यासोबत जिने चुकीचे केले तिला शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी त्याने पत्रातून केली आहे.गुंजनने धमक्या देताना, “मी मुलगी असल्याने न्यायपालिका माझ्या बाजूने आहे आणि तुझ्या मृत्यूने मला काहीच फरक पडत नाही,” असे म्हटल्याचा उल्लेखही ईश्वरलालने चिठ्ठीत केला आहे.तसेच, त्याने मित्रांना उद्देशून, “मी ज्यांना मदत केली त्यांनी माझ्या आई-वडिलांना मदत करावी आणि माझी कमतरता भासू देऊ नये,” अशी भावनिक विनंती केली आहे.

गुंजनवर गुन्हा दाखल

ईश्वरलाल विवाहित होता. पोलिसांनी त्याची पत्नी आणि मित्रांचे जबाब नोंदवले. गुंजन ही पैशांची मागणी करून लग्नासाठी दबाव टाकत होती व ईश्वरचा मानसिक छळ करीत होती, अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. या माहितीनंतर बजाजनगर पोलिसांनी गुंजनविरुद्ध ब्लॅकमेल करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ईश्वरने लिहिलेली चिठ्ठी व त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21
Next Post

Today Horoscope: वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांना मिळणार यश, जाणून घ्या कसे असणार तुमचे आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp