जालना : जालन्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेट खेळताना 32 वर्षीय युवकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विजय पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॉफी सामन्यांमध्ये हा खेळाडू खेळत असताना याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जागीच कोसळला. तर, आयोजकांनी या तरुणाला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यामुळे, अचानक झालेल्या या दुर्घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान, अचानक खेळता खेळता विजय पटेल खाली पडला. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, पण ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याचे विजयच्या सहकारी मित्राने सांगितले.