chandrashekhar bawankule : पुणे : राजकारण आणि क्रीकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही, असं म्हणत अनेक दशकांपासून ही म्हण प्रचलीत झाली आहे. म्हणून राजकीय नेत्यांना क्रीकेटची आवड असते. आता असच काहीस उदाहरण पहायला मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे शहरात क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटचा आनंद घेतला. बावनकुळे यांनी तुफान फटकेबाजी केली. बावनकुळे फलंदाजी करत असताना मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना गोलंदाजी केली.
पुणे शहरात भाजपाकडून क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप शहराध्यक्ष करंडक नावाने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. पुणे शहर भाजपातील सर्व विधानसभा मतदारसंघातील खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची दमदार फलंदाजी केली.
राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. स्पर्धेचे उद्घघाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळणारच आहे. फक्त कुठल्या कायद्याने हे आरक्षण देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील सगळ्या मंत्र्यांनी एकत्र आले पाहिजे. राज्यातील सर्वपक्षीय मराठे नेते आणि जरांगे यांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा फायदा कशात आहे, हे बघितले पाहिजे.