लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध विहार परिसरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेने दिलेली उपदेशिकेचे पठण करण्यात आले.
यावेळी ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूर्यकांत गवळी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, भोलेनाथ शेलार, उपसरपंच भारती काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक बापूसाहेब बोरकर, लोणी काळभोर सोसायटीचे माजी चेअरमन माऊली काळभोर, राहुल काळभोर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिताराम लांडगे, लोणी काळभोर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन संजय भालेराव, बहुजन समाज पार्टीचे बाळासाहेब आवारे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम सिद्धार्थ संघ तरुण मंडळ व भीमसत्ता प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सौजन्याने पार पडला.