बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर : निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर या परिसरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत कार्यालया मधील नरसिंहपुर, गिरवी, ओझरे, टणु, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गोंदी, लिंबोडी, लुुमेवाडी, सराटी, बावडा, शिंदेवस्ती, चव्हाण वस्ती, डीसले वस्ती, आडोबा वस्ती, या सर्वच भागामध्ये सविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात, व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधानाचे वाचन करून सविधान दिन साजरा करण्यात आला.
लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ केळी वाटप करण्यात आले. कै. महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्याचे पूजन उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त संविधान प्रतिमा व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम व प्रचंड जिद्दीच्या जोरावर संविधान लिहिले. आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही आसलेल्या भारत वासीयांना हे संविधान सुपूर्द केले.
ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वच भागातील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रत्येक गावोगावी शाळा, ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.