तुमच्यापैकी अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होत असेल. ॲसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे. ॲसिडिटी म्हणजे पोटात जास्त ॲसिड तयार होणे, ज्यामुळे छातीत जळजळ, पोटात जडपणा, अपचन आणि आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ही समस्या सहसा जास्त मसालेदार, तळलेले किंवा आंबट अन्न खाल्ल्यामुळे उद्भवते.
काही वेळा ॲसिडिटीचा त्रास इतका वाढतो की त्या व्यक्तीला दिवसभर अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. पण काही घरगुती उपायांनी या समस्येपासून तात्काळ आराम मिळू शकतो. त्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने पोटातील ॲसिड संतुलित राहते आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो. हा उपाय सौम्य ॲसिडिटीसाठी चांगला आहे. तसेच पुदिना आम्लपित्त दूर करण्यासाठी गुणकारी आहे. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्याने किंवा पुदिना चघळल्याने लगेच आराम मिळतो. यामुळे पोट थंड होते आणि आम्ल कमी होते.
बडीशेप पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानली जाते. ॲसिडिटीच्या वेळी बडीशेप चघळली पाहिजे किंवा त्याचे पाणी प्यावे. बडीशेप पचन प्रक्रिया सुधारते आणि पोटातील ऍसिड नियंत्रित करते. नारळाचे पाणीही प्रभावी ठरू शकते. याने शरीराला हायड्रेट तर करतेच, पण ते ॲसिडिटीपासूनही आराम देते.