नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील, तर लवकर उरकून घ्या. पुढच्या महिन्यात बँकेला जवळपास १३ दिवस सुट्टी असल्याने बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत. यासाठी बॅंका कधी बंद आणि कधी सुरु असणार आहेत. याची माहिती जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबत अनेक सण आहेत. या सणांच्या काळामध्ये बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये 13 दिवस बँका बंद राहणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. या महिन्यात ४,११,१८ आणि २५ सप्टेंबरला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. तर १० आणि २४ सप्टेंबरला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत.
दरम्यान, या कालावधीत ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.
सप्टेंबर महिन्यातील बँकच्या सुट्ट्यांची यादी
१ सप्टेंबर – गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) (पणजीत बँका बंद)
4 सप्टेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर – कर्मपूजा (रांचीमध्ये बँका बंद)
7 सप्टेंबर – पहिला ओणम (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
8 सप्टेंबर – थिरुओनम- (कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद)
9 सप्टेंबर – इंद्रजात्रा (गंगटोकमध्ये बँक बंद)
10 सप्टेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती
11 सप्टेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर – श्री नरवणे गुरु समाधी दिन (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
24 सप्टेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर – नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा (इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद)