लोणी काळभोर, (पुणे) :
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी…
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना…
गणपती बाप्पा मोरया ; पुढच्या वर्षी लवकर या..
अशी आर्त हाक देत पूर्व हवेलीत गणपती बाप्पाला विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.., गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजकार.., अशा जयघोषात पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शुक्रवारी (ता. ०९) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
पूर्व हवेलीत शुक्रवारी सकाळी आकरा वाजल्यापासूनच मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली होती. यंदा दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांसह विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यामध्ये वेगळा उत्साह पाहण्यास मिळत होता. बहुतांश भाविकांनी ‘बाप्पा’ ची मूर्ती ग्रामपंचायतीच्या वतीने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी सायंकाळी विधिवत पूजा, आरती करत गणरायाला निरोप देण्यात आला.
कदमवाकवस्ती येथील येथील मयूर कदम व संग्राम कदम मित्र परिवार नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने स्वखर्चाने मयूर कदम, संग्राम कदम, नितीन लोखंडे, हे मागील ५ वर्षापासून गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती. यावेळी मूर्ती दान करणाऱ्या भाविकांना ग्रुपच्या वतीने एक झाड देण्यात आले.
असाही उपक्रम
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील जी. एम. ग्रुपच्या माध्यमातून लोणीकाळभोऱ परिसरात पुणे-सोलापूर हायवे वर वाढलेले अपघाताचे प्रमाण यामध्ये तरुण युवक व युवती मृत्युच्या विळख्यात सापडत आहेत. हे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियमचे पालन करावे हे सांगणारे गणेशाचे बॅनर जी. एम. ग्रुप ने देखाव्याच्या रूपाने लावले होते. वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश, असे देखावे तयार करण्यात आले होते.
जी. एम. ग्रुप सामजीक बांधिलकी जपत लोणी काळभोर येथे पर्यावरण वाचवा उपक्रमाअंतर्गत ‘मूर्तिदान व निर्माल्य दान’ हा उपक्रम गेली ७ वर्षा पासून राबवत आहे. लोणीकर याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्याच बरोबर ‘बेटी बचाव बेटी पढाव’, झाडे लावा झाडे जगावा, एक कन्या दाम्पत्य सत्कार, विद्यार्थी चे बौद्धिक कौशल्य वाढी करिता विविध स्पर्धा, कोरोना काळात कोरोंना किट वाटप यासारखी विविध समाजिक उपक्रम राबविले होते. हे उपक्रम शिवाजी जवळे, रंजीत जगताप, सचिन गायकवाड, ओंकार नेवासे, संदीप फुले, अमोल गायकवाड, संतोष भुजभळ, सागर भुजबळ, अक्षय देडगे, महेश गायकवाड, रोहित गायकवाड राबवीत आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवला जात आहे. तसेच तांबे वस्ती परिसरात ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल तांबे यांच्या वतीने परिसरात कृत्रिम हौद बनविण्यात आला होता.
दरम्यान, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लोणी काळभोर मधील श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळ, क्रांतिवीर व समता समाज मित्र मंडळ, महात्मा गांधी प्रतिष्ठान, जय महाराष्ट्र व जय बजरंग मित्र मंडळ, तिरंगा व गणराज मित्र मंडळ, आदर्श तरुण मंडळ, अखिल रायवाडी मित्र मंडळ, महात्मा फुले व त्रिमूर्ती मित्र मंडळ आदी मंडळांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तसेच कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीतील लोणी स्टेशन येथील श्रीगणेश मित्र मंडळ, मूनलाईट मित्र मंडळ व धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळ, संभाजीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळ, कदमवस्ती येथील सम्राट मित्र मंडळ, तर वाकवस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, तर कवडीमाळवाडी गुजर वस्ती येथील विनायक प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने ही भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
उरुळी कांचन मधील आश्रम रोड परिसरातील महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, बाजार मैदान येथील अनुपम मित्र मंडळ, भोलेनाथ तरुण मंडळ, गूळ आळी येथील श्रीमंत वीर तरुण मंडळ, तुपे वस्ती येथील नवजीवन मित्र मंडळ, महात्मा गांधी रास्ता परिसरातील श्रीकृष्ण मित्र मंडळ, साईनाथ तरुण मंडळ, पोलिस चौकी परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळ, तळवाडी चौक परिसरातील अखिल तळवाडी मित्र मंडळ, शिंदवणे रोड येथील नव आझाद तरुण मंडळ या महत्त्वाच्या मंडळांप्रमाणेच शिंदवणे येथील शिवछत्रपती तरुण मंडळ, सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ, अखिल सोरतापवाडी सार्वजनिक गणेश गावठाण गणेशनगर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, एकता तरुण मंडळ, शिवतेज मित्र मंडळाने भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.