पुणे : नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील श्री साई कॉलेज ऑफ फार्मसी येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी लागणारी सर्व माहिती आम्ही तुम्हाला आता देत आहोत. इच्छुक उमेदवार घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
श्री साई कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी 1 जून 2024 पासून अर्ज करता येणार आहे. तर 8 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार [email protected] या ई-मेल आयडीवर आपला उमेदवारी अर्ज पाठवू शकतील.