सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. त्यामुळे सगळीकडेच थंडीचे वातावरण आहे. ही थंडी दुपारच्या तुलनेने सकाळी आणि रात्री प्रचंड असते. डिसेंबर जसजसा जवळ येईल तसतशी थंडी आणखी वाढेल. अशा परिस्थितीत थंडीत स्वतःला उबदार ठेवण्यासाठी काही गॅजेट्स घरात असणे आवश्यक आहे. ज्याने तुम्हाला थंडीतही गरमीचा अनुभव घेता येऊ शकेल.
हिवाळ्यात अन्न गरम राहावं यासाठी प्रयत्न केले जातात. पण काही केल्या जास्त वेळ अन्न गरम राहत नाही. त्यामुळे हे अन्न गरम ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक लंच बॉक्स हे अतिशय उपयुक्त साधन असू शकते. मिल्टन युरोलिन फ्युट्रॉन स्टेनलेस स्टील इलेक्ट्रिक लंच बॉक्स सहजपणे प्लग इन केला जाऊ शकतो आणि 30 मिनिटांत अन्न गरम करतो. याची किंमतही परवडणारी आहे.
तसेच हिवाळ्यात गरम पेय अथवा पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे गरम पाणी, चहा, कॉफी किंवा सूपची मागणी वाढते. आपल्याकडे जर इलेक्ट्रिक किटली असेल तर ती फारच उपयुक्त ठरू शकेल. त्यासाठी बजाज केटीएक्स 1.8 लीटर डीएलएक्स इलेक्ट्रिक किटली उपलब्ध असून, ती तुम्हाला घरबसल्या ऑर्डर करता येऊ शकणार आहे.
आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तेव्हा गरम काहीतरी असावं यासाठी प्रयत्न करतो. त्यात जर रूम गरम असली किंवा गारठा कमी जाणवत असल्यास चांगलं वाटतं. पण सध्या बाजारात 2000 वॅट हीट कॉन्व्हेक्टर रूम हीटर उपलब्ध आहे. त्याचा वापर केल्यास तुम्हाला थंडीपासून थोडा दिलासा मिळू शकतो.