पुण्यात भंगाराच्या दुकानांमध्ये स्फोट; एकाचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर या इतर तीन व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महबूब शेख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना शहरातील बी टी कवडे रस्ता, नवशा गणपतीपुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये आज (दि.२७) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा स्फोट कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकल नाही
याबाबत अधिक माहिती अशी कि, बी.टी. कवडे रोड येथील एका भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या घटनेत एका व्यक्तिचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन व्यक्ति जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी सांगितले कि, आम्ही स्वतः घटनास्थळावर असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून घेत आहे. मात्र, या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.