मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्याबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा असेल, तेव्हा कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाहीत. तसेच पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी परिपत्रक काढले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.