Clothes Tips : मान्सून अखेर महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. पाऊस आणि पावसाळा कितीही हवाहवासा वाटत असला तरी पावसाळ्यात काही गोष्टींची फारच अडचण होत असते. पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. घराबाहेर गेल्यावर पावसाची छोटी सरदेखील पूर्ण भिजवून टाकते. चिखल आणि पाण्यामुळे कपडे वारंवार खराब होतात. ज्यामुळे सतत कपडे धुवून वाळत घालावे लागतात. मात्र, पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता वाढलेली असल्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. सततच्या पावसामुळे अनेक दिवस सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळे सगळीकडे जलमय वातावरण असल्याने कपडे नीट सुकवता येत नाहीत व धुतलेले कपडे दोन तीन दिवस ओलसर दमट राहतात त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते.(clothes Tips)
कपडे वाळवण्यासाठी सोपे उपाय
अशा परिस्थितीत आपण अनेक दिवस ओले कपडे वापरल्यास आपल्याला त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला पावसात जरा जास्तच काळजी घ्यावी लागते.(clothes Tips) पावसाळ्यात ओले कपडे सुकवणे थोडे कठीण काम जरी असले, तरी येथे नमूद केलेल्या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे बऱ्यापैकी सुकवू शकता आणि त्यातील ओलावा दूर करू शकता. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स जरूर फॉलो करा.
– कपडे सुकावण्यासाठी स्टँड वापरणे
पावसाळ्यात कपडे सुकविण्यासाठी कपड्यांचे रॅक किंवा स्टँड वापरणे योग्य ठरते. चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले स्टँड आणि रॅक खोलीच्या आत देखील ठेवता येतात आणि कपडे लटकवण्यासाठी आणि पंख्याखाली सहज सुकविण्यासाठी वापरता येतात. यासाठी तुम्हाला पॉवर ड्रायरचीही गरज भासणार नाही. फक्त कपडे धुवा आणि पूर्णपणे सुकण्यासाठी कपड्याच्या स्टँडवर किंवा कपड्याच्या रॅकवर टांगून ठेवा.(clothes Tips)
– खोलीत खडेमीठ ठेवा
खडे मीठ हवामानातील आर्द्रता शोषून घेते. जर तुम्ही खिडकीत अथवा खोलीच्या कोपऱ्यांमध्ये एखाद्या वाटीत ठेवले तर त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण कोरडे राहण्यास मदत होऊ शकते.
– इनरवेअर्स इस्त्रीने सुकवा
इनरवेअर्स वॉशिंगमशीनमध्ये धुता येत नाहीत. असे कपडे हातानेच धुवावे लागतात. शिवाय इतर कपड्यांपेक्षा अंर्तवस्त्रे जाड असल्यामुळे ती लवकर सुकत नाहीत. यासाठी जर तुमची अंर्तवस्त्रे लवकर सुकत नसतील तर ओलसर कपड्यांना कोरडे करण्यासाठी त्यांना इस्त्री करा. इनरवेअर ओलस(clothes Tips) र असल्यास ते कोरडे केल्याशिवाय मुळीच परिधान करू नयेत, कारण त्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
– घरात धूप घाला
कपड्यांच्या ओलसरपणामुळे घरात येणारा कुबट वास धूपामुळे कमी होतो. शिवाय यामुळे कपड्यांनादेखील चांगला वास येऊ शकतो. नियमित घरात धुप घातल्यामुळे तुम्हाला प्रसन्नदेखील वाटेल.
– हलक्या रंगाचे कपडे आणि रंगीत कपडे वेगवेगळे वाळत घाला
कपडे वाळत घालताना सफेद अथवा हलक्या रंगाचे कपडे रंगीत कपड्यांसोबत वाळत घालू नका. कारण जर कपडे ओलसर राहीले तर रंगीत कपड्यांचा रंग तुमच्या सफेद अथवा इतर हलक्या रंगाच्या कपड्यांना लागू शकतो.
– खोलीतील आर्द्रता कमी
खोलीतील आर्द्रता कमी होते तेव्हा कपडे लवकर सुकणे सोपे होते. यासाठी तुम्ही ह्युमिडिफायर देखील वापरू शकता. जेव्हा हवामान स्वच्छ असेल, सूर्य चमकत असेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा. सूर्यप्रकाशामुळे घरातील वातावरण स्वच्छ होईल व घरातील निर्जंतुकीकरण करेल. सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण स्वतःमध्ये जंतुनाशक म्हणून काम करतात.(clothes Tips)
– हँगरचा वापर करा.
कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हँगर्सचा वापर करू शकता. कपडे लवकर सुकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हँगरवर कपडे लावल्याने कपडे लवकर सुकण्यास मदत करते कारण ते पसरलेले असतात आणि जास्त हवेच्या संपर्कात येतात.
– कूलरचा वापर करून कपडे कोरडे करा
कपडे लवकर सुकण्यासाठी कूलरचाही उपयोग होऊ शकतो जेव्हा हवामान थंड असते तेव्हा कूलरची गरज लागत नाही, परंतु कपडे सुकविण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकते. कपडे स्टँडवर नीट पसरवून ठेवा आणि त्यांच्यासमोरचा कुलर चालू करा. पण लक्षात ठेवा की कूलरचा पाण्याचा पंप बंद असेल, जर पाण्याचा पंप चालू राहिला तर कपड्यातील ओलावा लवकर जाणार नाही व कपडे कोरडे होण्यास अधिक वेळ लागेल.(clothes Tips)
– वॉशिंग मशीन ड्रायरचा वापर करा
पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत पण जेव्हा तुम्ही मशीन मध्ये कपडे धुतल्या नंतर त्याचा वापर करून तुम्ही मशिनमध्येच कपडे नीट वाळवण्यासाठी मशिनचा सुकण्याचा वेळ थोडा वाढवा. जर तुम्ही सामान्यतः एक मिनिटासाठी ड्रायर वापरत असाल तर त्याचा वेळ ३ मिनिटांपर्यंत वाढवा. या मुळे कपड्यातील पाणी शोषून घेतले जाते,(clothes Tips) ड्रायर मध्ये कपडे चांगले सुकतात त्यानंतर तुम्ही त्याला मोकळ्या वातावरणात टाकू शकता. मशीन मध्ये कपडे पंखा व सूर्यप्रकाशाशिवाय वाळवले जातात.
– हेअर ड्रायरचा वापर करा
तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर तुम्ही हेअर ड्रायरचीही मदत घेऊ शकता. हेअर ड्रायरचा वापर करून तुम्ही तुमचं कपडे लवकर सुकवू शकता. जर तुम्ही तुमचे प्राधान्य कपडे सुकण्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरू शकता. होय, पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जाऊ शकतो कारण ते वापरण्यास सोपे आणि प्रभावी आहे.(clothes Tips)
– एसीच्या बाहेरील युनिटजवळ कपडे सुकवा
पावसाळ्यात सगळीकडेच ओलावा असतो. अशा परिस्थितीत घरात एसी चालवणे आवश्यक आहे. एसीचे बाह्य युनिट नेहमी गरम असते, एसीच्या compressor मधून नेहमी गरम हवा बाहेर टाकली जाते. त्यामुळे तुम्ही कपडे सुकविण्यासाठी एसीच्या बाहेरील युनिटजवळ कपड्यांचे स्टँड ठेवू शकता. येथे कपडे खूप लवकर सुकतात.
– हीटरचा वापर करा
हीटरचा वापर थंड हवामानात केला जातो, परंतु याचा वापर आपण पावसात कपडे सुकविण्यासाठी देखील करू शकतो. हीटर किंवा ब्लोअर कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता. कपडे धुतल्यानंतर ओल्या कपड्यांमधून अतिरिक्त पाणी काढून टाकुन ते कपडे हीटर किंवा ब्लोअरजवळ ठेवा कपडे लवकर सुकतात.
या सर्व टिप्स पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा सहज वापर करू शकता.(clothes Tips)