ठाणे : सार्वजनिक बांधकाम खात्यात केलेल्या कामाची टक्केवारी मागणाऱ्या लाचखोर लिपिकास अटक करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंत्यास २० आणि स्वतःला ५ हजार अशी २५ हजारांची लाच त्याने मागितली होती. मात्र, तडजोडीअंती २३ हजार रुपये देण्याचे ठरले, ते लिपिक विजय शंकर आव्हाड याने स्वीकारले. ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २६ डिसेंबर रोजी त्याला अटक केली. त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.