पुणेः सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणातून दोन गटात जोरदार चकमक उडाली. त्यामध्ये चौघे जण जखमी झाले. यासंदर्भात दोन गटांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात स्वप्नील संतोष खिरीड (वय २०, रा. लायगुडे वस्ती, अंबाईदरा, धायरी) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, अविनाश शिळीमकर, कुणाल जाधव, आदित्य म्हस्के, अथर्व दोडके, अथर्व शिंदे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शिळीमकर, म्हस्के, दोडके यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी शिळीमकर याने फिर्यादीनुसार, अमित कदम, ओंकार भोसले यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर आणि त्याचे मित्र धायरीतील पोकळे वस्ती परिसरात थांबले होते. आरोपी कदम, भोसले आणि साथीदार तेथे आले. त्यांनी शिळीमकर याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.