पुणे : आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” (Safe Mother Safe Home) हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
या अभियाना अंतर्गत राज्यातील सरकारी इस्पितळात गरोदर माता व 18 वर्षावरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तरी राज्यभरातील महिलांनी या अभियानास उत्सफूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. कारण गृहिणी खेड्यातील असो वा शहरातील त्या कायमचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणूनचं राज्य सरकार नवरात्राच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम राबवणार आहे
या अभियानात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या घरातील माता निरोगी रहावी,जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे
देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालची दुर्गापूजा , गुजरातच्या दिंडीया असा विविधतेने नटलेला हा उत्सव असतो. तसेच महाराष्ट्रातही देवी आईचा जागर करत महाराष्ट्रात नवरात्राचा उत्सव धुमधडाक्यात पार पडतो. आज पासून सुरु होणाऱ्या नवरात्राबाबत राज्य सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. एका अनोख्या उपक्रमासह यावर्षी नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.