मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. महाराष्ट्रात सापडलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिसीद्वारे संवाद साधला आहे. यावेळी अधिकाऱ्यांना कामाबाबत टार्गेट ठरवून दिले आहे. हे टार्गेट स्थानिक कार्यालयापर्यंत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आता कामे करावी लागणार आहेत.
100 दिवसांत पूर्ण करावयाची कामे अग्रक्रमावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत पूर्ण करावयाची कामे अग्रक्रमावर घ्यायला सांगितली आहेत. ही कामे विभागासोबतच आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा करावी लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक कार्यालयांना 100 दिवसांचे लक्ष्य दिले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या विभागाच्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते ती सर्व माहिती त्यावर प्रदर्शित करा .
मुख्यमंत्र्यांनी कोणती कामे करायला सांगितली?
सर्व शासकीय कार्यालये साफ असली पाहिजेत, अनावश्यक कागदांचे ढिग रिकामे करा. पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकारी अनावधानाने भेटी देतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे.
नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवा
नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवा. सामान्य माणूस कोणत्या वेळेत भेटायला येऊ शकतो, त्याची स्पष्ट माहिती नमूद करा. 90% समस्या स्थानिक पातळीवर सुटू शकतात. पण ते होत नाही, म्हणून मंत्रालयात गर्दी होते. लोकशाही दिनासारखे उपक्रम हाती घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर
फ्लॅगशिप कार्यक्रम/योजनांना भेटी तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र येथे भेटी द्या. ही सर्व कामे होत आहेत की नाही, याकडे सचिवांनी हिरीरीने लक्ष द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.