Chhagan Bhujbal : नागपूर : मराठा आणि ओबीसी वाद चांगलाच चिघळत चालला असल्याचे चित्र आहे. मला जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचे छगण भुजबळ यांनी काल स्वतः सभागृहात सांगितले. घराबाहेर अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने भुजबळांनी पोलिसांना नेमके प्रकरण काय अशी विचारणा केली. त्यावर मला गोळी मारली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली असं भुजबळ म्हणाले. मात्र आज भुजबळांच्या फार्म बाहेरील सगळे पोलिस गायब असल्याने त्यांच्या सुरक्षेचे तीन तेरा झालेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मॉर्निंग वॉकला जाऊ नका, असा मला सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळांच्या कॉलेजजवळ जमा होण्याचे मेसेज फिरत आहेत. याचा अर्थ बीडला झालं तसं करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यावर फायरिंग केली जाईल असं मला माझ्या लोकांकडून कळलं. सीआयडीकडून पोलिसांना माहिती दिली गेली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालला असल्याचे चित्र आहे. आता छगण भुजबळ यांनी मला जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचे काल स्वतः सभागृहात सांगितले.
घराबाहेर अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने भुजबळांनी पोलिसांना विचारणा केली. त्यावर मला गोळी मारली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे त्यांचा मॉर्निंग वॉक बंद केला आहे. मात्र काल अचानक सुरक्षा वाढवल्यानंतर आज त्यांच्या फार्मबाहेर एकही पोलिस नसल्याने सुरक्षेसंबंधी मोठा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे. मनोज जरांगे, छगण भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावरून शाब्दिक युद्ध सुरू पाहायला मिळते. भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असं मनोज जरांगे म्हणतात तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका छगण भूजबळ यांची आहे. यामुळे दोघांमध्येही टोकाच्या टिका टिपण्या होत असतात.