हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील नागरिकांशी ते थेट संवाद साधत आहेत. हिंगणेमळा, ससाणेनगर, काळेबोराटे नगर येथे बाईक रॅली आणि पदयात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. परिसरातील महिला, युवती, तरुण, ज्येष्ठ सर्वानी त्यांची भेट घेत औक्षण करून, त्यांना शुभेच्छा दिल्या.
“हडपसरच्या जनतेसाठी मी कायमस्वरूपी उपलब्ध आहे. हडपसरला गतिमान विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही माझी माणसं त्यांच्या भूमिपुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील यात शंका नाही अशी भावना चेतन तुपे यांनी व्यक्त केली.
या दुचाकी व पदयात्रेला पुणे महानगर पालिकेच्या माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले, माजी महापौर वैशालीताई बनकर, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे, पुणे शहर शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका विजयाताई कापरे, माजी नगरसेविका विजयाताई वाडकर, सुनील बनकर, बाळासाहेब न्हावले, महेश ससाणे,सागर राजे भोसले, विठ्ठल विचारे, योगेश सूर्यवंशी, स्मिताताई गायकवाड, आकाश डांगमाळी, अश्विनी वाघ, ऐश्वर्या शिवले, पल्लवी होले, ओंकार तुपे उपस्थित होते.