Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुष्मान भारत योजनेत फेरबदल!112 आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत बंद होणार? 1 डिसेंबरपासून नियम बदलणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 November 2026, 15:26

पुणे : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या नियमांत मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत येणारे 112 आजार आणि शस्त्रक्रिया केवळ सरकारी रुग्णालयांतच करण्याचा प्रस्ताव नॅशनल हेल्थ अथॉरिटीने (NHA) पुढे आणला आहे. यामध्ये स्त्रीरोग, हाडांचे आजार, मोतीबिंदू, हाय रिस्क डिलिव्हरी, व मानसिक आरोग्याशी संबंधित उपचारांचा समावेश आहे. हा प्रस्ताव 1 डिसेंबर 2026 पासून लागू करण्याचे नियोजन आहे.

सध्या या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचे कवच मिळते. यासाठी सरकारी व खासगी दोन्ही रुग्णालयांचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आधीचे 23 आणि नवीन जोडले जाणारे 89 अशी एकूण 112 पॅकेजेस सरकारी रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र सर्व राज्यांच्या आरोग्य प्राधिकरणांना पाठवण्यात आले असून, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टममध्ये हा बदल केला जाऊ शकतो.

या बदलामुळे खासगी रुग्णालयांत हे उपचार पूर्णपणे बंद होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचा सरसकट सर्व खासगी रुग्णालयांवर परिणाम होणार नाही. ही व्यवस्था कशी लागू करायची आणि कोणती पॅकेजेस राखीव ठेवायची, याचा अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक राज्याला असणार आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरातसह काही राज्यांत अशी आंशिक व्यवस्था आधीपासून सुरू आहे.

यामागे सरकारी आरोग्य यंत्रणा बळकट करणे आणि उपचारांचा खर्च नियंत्रित ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारी रुग्णालयांवरील ताण वाढणार आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक यंत्रसामग्री आणि उपचारांची योग्य सोय आहे का, याची चाचपणी राज्य सरकारतर्फे केली जात आहे. उत्तराखंडसह अनेक राज्यांनी यावर तज्ज्ञांची मते मागवली आहेत.

नव्या बदलामुळे आयुष्मान कार्डधारकांनी उपचारासाठी जाण्यापूर्वी आपल्या राज्याने कोणता नियम स्वीकारला आहे आणि संबंधित पॅकेज त्या रुग्णालयात उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे ठरणार आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खळबळ! अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल १ कोटी ४८ लाखांची रोकड जप्त; आरपीएफची धडक कारवाई

Friday, 13 November 2026, 17:49

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:48

फटाके बाजूला उडवण्यास सांगितल्याचा राग! टोळक्याच्या बेदम मारहाणीत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Friday, 13 November 2026, 17:37

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:15

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी करत सुरू होता काळ्या जादूचा खेळ; गावकऱ्यांच्या सतर्कतेने भोंदूबाबाचा भांडाफोड

Friday, 13 November 2026, 16:54

महसूल मंत्र्यांच्या आदेशाला पुरंदरमध्ये केराची टोपली! सामायिक जमिनीच्या खरेदीखतावरून महसूल विभागात खळबळ

Friday, 13 November 2026, 16:41
Next Post

बहिणी भाऊबीजेला माहेरी आल्या पण सख्ख्या भावानेच केला बेसबॉल स्टिकने हल्ला! मारहाण अन् शिवीगाळ; पिंपरी-चिंचवडमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp