पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या, बुधवारी (दि.11 डिसेंबर) पादचारी दिनाच्या दिवशी ‘वॉकिंग प्लाझा’ हा उपक्रम पार पडणार आहे. त्यामुळे उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान बदल करण्यात आला आहे. यामुळे 50 बसच्या मार्गात बदल होणार आहे.
‘वॉकिंग प्लाझा’ या उपक्रमासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे उद्या बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरून नियमितपणे धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे.
असा असेल बस मार्गात बदल…
-बसमार्ग क्रमांक – 55, 58, 59 हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
-बसमार्ग क्रमांक -57 या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून जाताना केळकर रस्ता, नारायण पेठ मार्गे टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
-बसमार्ग क्रमांक – 174 पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताने सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अ.ब.चौक, नारायणपेठ, अलका टॉकिज चौकहून
-बसमार्ग क्रमांक – 197 व 202 या मार्गावरील बसेस हडपसर येथून कोथरुड डेपो, वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने धावेल. अ.ब.चौक, नारायण पेठमार्गे अलका टॉकिज चौक, आपल्या निर्धारित मार्गाने धावणार आहे.
-बसमार्ग क्रमांक – 68 या मार्गावरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्त्याने धावेल.