उरुळी कांचन : अल्पावधीत आयटी क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कल्पकतेने ठसा उमटविणारे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ संस्थेचे अध्यक्ष नवनाथ हंबीर यांचा ‘महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मूळचे पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावचे सुपुत्र नवनाथ हंबीर यांनी अत्यल्प कालावधीत उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ या नावाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळीकांचन व शेवाळेवाडी या ठिकाणी त्यांच्या शाखा असून हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यापूर्वी देखील हंबीर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.