Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या क्रिकेट सोडून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. त्यातच शनिवारी चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचे वृत्तही समोर आले होते. आणि चहलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीचे सर्व फोटो डिलीट केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चहलने उशिरा रात्री इस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मला वेदना होत असल्याचे लिहिले आहे. चहलच्या या पोस्टमुळे घटस्फोटांच्या चर्चांना दुजोरा मिलाळाल्याचे बोलले जात आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घटस्फोट अंतिम आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. या सर्व बातम्यांदरम्यान, युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘कठोर परिश्रम लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकतात. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे. तुम्ही मजबूत उभे आहात. तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो घाम गाळला आहेस, संघर्ष केला आहेस, त्याचा तुझ्या आई-वडिलांना अभिमान आहे.त्यामुळे ताठ उभा राहा आणि चांगला मुलगा असल्याचा अभिमान बाळग.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून हे कपल वेगळे राहत आहेत आणि त्यांचे वेगळे होणे जवळपास निश्चित झाले आहे, जरी त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समजले नाही. युझवेंद्र चहल आणि त्यांच्या पत्नीकडून घटस्फोटाच्या बातम्यांबाबत अद्याप कोणतेही विधान आले नाही.