मुंबई: भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल बायको धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. चहलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील धनश्रीचे सर्व फोटो हटवले आहेत. त्याचसोबत त्याचं इस्टा स्टेटस पाहून दोघांच्या नात्यात दूरावा आल्याचं स्पष्ट होत आहे. दोघांच्या नात्यातील दुराव्यामागे श्रेयस अय्यरला कारणीभूत ठरवलं जात आहे. अशातच आता युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही क्रिकेटर बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा सूरू आहे.त्यामुळे दोघांमध्ये घटस्फोटावरून तुफान राडा होण्याची शक्यता आहे.
कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांची उपस्थिती
भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही रि अॅ लिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस-18’ चा ग्रँड फिनाले जवळ येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीना टंडन, तिची मुलगी राशा आणि अमन देवगन शनिवारी लाईव्ह होणाऱ्या एपिसोडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘आझाद’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. तर रविवारी लाईव्ह होणाऱ्या एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर दिसणार आहे. त्याच्यासोबत युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग येण्याची शक्यता आहे. हे तिघेही क्रिकेटपटू आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे या शोला विनोदी छटा देण्यासाठी कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळेच सध्या युझवेंद्र चहल बिग बॉसमध्ये एन्ट्री मारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर देखील बिग बॉसमध्ये दिसणार आहे.त्यात धनश्री वर्मासोबत चहलच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना चहल आणि अय्यरमघ्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अलिकडेच युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत फिरताना दिसला होता. त्यानंतर धनश्रीने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती म्हणाली की, गेल्या काही दिवस तिच्या आणि तिच्या कुटुंबियांसाठी चांगले गेले नाहीत. लोक तथ्यांशिवाय त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत आहेत,अशा शब्दात तिने ट्रोलर्सना सुनावलं आहे. तर दुसरीकडे, चहल गेल्या काही दिवसांपासून गूढ पोस्ट करत आहे. एका पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, शांत राहण्यात आनंदाची भावना असते. दुसऱ्या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले की, तुमच्या पालकांचे डोके नेहमी अभिमानाने उंच ठेवा.
दरम्यान आता चहल-अय्यर खरंच बिग बॉसमध्ये एकत्र दिसणार आहेत का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.