पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने सर्व नागरिकांना तिरंगा झेंडा फडकविण्याचे अवाहन केले आहे. त्यासाठी देशात हर घर तिरंगा हि अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. तर आपण राष्ट्रध्वज फडकविण्याची योग्य पद्धत व काय करू नये ते पुढीलप्रमाणे पाहूया.
१) राष्ट्रध्वज फडकविण्याची योग्य पद्धत
कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, गरज नाही. सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या कपड्याचा ध्वज असावा.
ध्वज लावताना केशरी रंगाची वाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.”
तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा.
झेंड्याची लांबी रुंदीचे प्रमाण ३ : २ असावे.
अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.
कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.
घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही
ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये.
राष्ट्र ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.
२) काय करू नये
प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.
फाटलेला अथवा चुरगाळलेला ध्वज लावू नये.
ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये, अथवा बांधू नये.
ध्वज मलीन होईल अशा पद्धतीने वापरू नये किंवा ठेवू नये.
ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.
राष्ट्रध्वजाचा उपयोग पडद्यासाठी अथवा अन्य वापरासाठी करू नये
ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा काठीच्या टोकावर फुले किंवा हार घालू नये.
अन्य कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लागत नसावा
ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.
तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नका.
अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा.