दिल्ली : घरात प्रचंड कोट्यवधींचं घबाड सापडल्याने वादग्रस्त ठरलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली होती. त्यांच्या या बदलीला अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. कॉलेजियमने सरकारकडे याची शिफारस केली होती त्यानुसार वर्मा यांना आता अलाहाबाद कोर्टात पदभार स्वीकारावा लागणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी होळीदिवशी झालेल्या अग्निकांडात पैशाचे घबाड सापडले यानंतर संपूर्ण न्यायव्यवस्था हादरली. त्यानंतर त्यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत प्रचंड खळबळ उडाली असून बदली करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची सीबीआय आणि ईडी सह इतर संस्थामार्फत चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आली होती.
दरम्यान याआधी ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी न्यायमूर्तींची बदली नको थेट राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार आज न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.