Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाद्यतेल दरात तातडीने 15 रूपयांची कपात करण्याचे केंद्राचे निर्देश

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 14:47

पुणे : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 6 जुलै 2022 रोजी झालेल्या बैठकीत, प्रमुख खाद्यतेल विक्रेत्या संघटनांना खाद्यतेलाच्या किमती 15 रूपयांनी त्वरित कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारने असाही सल्ला दिला आहे की उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांकडून वितरकांना दिल्या जाणाऱ्या दरातही कपात करण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे दरकपात कोणत्याही मार्गाने निष्फळ ठरू नये. सरकारतर्फे यावर जोर देऊन सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा दर कमी होतील, तेव्हा उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना त्वरित दिला पाहिजे आणि विभागाला त्याबाबत नियमित माहिती दिली जावी.

ज्या कंपन्यांनी अजूनही खाद्यतेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत आणि त्यांची कमाल किरकोळ किंमत अजूनही इतर ब्रँड्सपेक्षा जास्त आहे, त्यांनाही किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आयात केलेल्या खाद्यतेलाच्या किमतीत घट होत असून हा खाद्यतेलाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक कल आहे, त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाने त्यास अनुरूप अशा देशांतर्गत बाजारपेठेतही किमती खाली येतील, याची सुनिश्चिती करण्याची आवश्यकता आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. आणि ही तेलाच्या दरातील कपात ग्राहकांपर्यंत अत्यंत त्वरित आणि कसलीही टाळाटाळ न करता पोहचवली पाहिजे, असेही बैठकीत सांगण्यात आले. किमतींची माहिती गोळा करणे, खाद्यतेलावरील नियंत्रणाचा आदेश आणि खाद्यतेलाचे पॅकेजिंग यावरही बैठकीत चर्चा झाली.

 

मे 2022 मध्ये, प्रमुख खाद्यतेल संघटनांची बैठक विभागाने बोलवली होती आणि सूत्रांनी सांगितल्यानुसार, एक लिटरच्या फॉर्च्युन रिफाईन्ड सनफ्लॉवर तेलाच्या पाकिटाची किमत 220 रूपयांवरून 210 रूपयांवर आणली होती तसेच सोयाबीन (फॉर्च्युन) कच्ची घानी तेलाच्या एक लिटर पॅकची किमत 205 रूपयांवरून 195 रूपयांवर आणली होती, याची आठवण ठेवणे आवश्यक आहे.

तेलाच्या दरातील घट केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून ते स्वस्त केल्याच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. ग्राहकांना निर्विवादपणे तेलाच्या दरकपातीचा संपूर्ण लाभ दिला जावा, असा सल्ला उद्योगाला देण्यात आला होता.

आंतरराषट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या भावात अत्यंत वेगाने घट होत असल्याचे चित्र दिसत असताना ,स्थानिक बाजारात मात्र परिस्थिती वेगळीच आहे, इथे खाद्य तेलाचे भाव हळूहळू कमी होताना दिसत आहेत. या पार्श्वूमीवर भारत सरकारने पुढाकार घेऊन एक बैठक आयोजित केली होती.

आंतरराषट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव घटले असताना देशात खाद्य तेलाचे भाव कसे कमी करता येतील याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने देशातील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसह SEAI,IVPA, आणि SOPA या कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली .

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या महिन्यात वेगवेगळ्या खाद्य तेलांचे भाव प्रती टन 300-400 डॉलरने(USD) कमी झाले आहेत.स्थानिक बाजारात याचे परिणाम दिसायला काही वेळ लागेल. येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या घाऊक किमती कमी होताना दिसतील,असे या बैठकीत उपस्थित उद्योजकांनी सांगितले.

देशातील खाद्य तेलाच्या किंमती आणि खाद्य तेलाची उपलब्धता यावर विभाग सतत लक्ष ठेवून आहे. खाद्य तेलावरचा अधिभार कमी करण्याचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असलेली घट बघता याचा फायदा न चुकता ताबडतोब अगदी शेवटच्या ग्राहकाला झाला पाहिजे हा यामागचा हेतू आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे ग्राहकाचा खाद्य तेलावरचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे हे निश्चित.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: उरुळी कांचनमध्ये मागील तीन दिवसांपासून घरांवर दगडफेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Monday, 5 October 2026, 22:12

राज्यात पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात लागू करण्याचे निर्देश; २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत शासनाचा मोठा निर्णय

Monday, 5 October 2026, 21:40

आता लवकरच तुमच्या खिशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! RBI कडून प्लास्टिकच्या नोटांची फील्ड ट्रायल; काय आहे या नोटांचं वैशिट्य?

Monday, 5 October 2026, 21:08

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर! तुमच्या जिल्ह्यात किती दिवस शाळा राहणार बंद? पहा संपूर्ण वेळापत्रक

Monday, 5 October 2026, 21:03

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16
Next Post

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे 70% काम पूर्ण; महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मिळणार गती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp