पुणे, ता. 13 : बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या 24 तासांच्या आत शोध घेण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तातडीने तीन स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुलीचा शोध घेतला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. विश्रांतवाडी पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे कौतुक होत आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 12 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे 2 वाजून 18 मिनिटांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. मुलीचा शोध घेण्यासाठी तातडीने तीन पोलीस पथके नियुक्त करण्यात आली.
या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून मुलीचा माग काढला. अखेर अवघ्या 24 तासांत मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक किशोरी माने, सहायक पोलीस निरीक्षक सुनील उगले तसेच पोलीस अंमलदार कृष्णा माचरे, संजय बादरे, वामन सावंत, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे आणि अक्षय चपटे यांनी केली.







