नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईडीनंतर आता सीबीआयनेही अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली असून के. कविता यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने शनिवारी 6 तास चौकशी केली. त्यानंतर आज म्हणजेच गुरुवारी तिहार तुरुंगातून के. कविता यांना अटक केली.
वास्तविक के. कविता आज तिहार तुरुंगात राहणार असून उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, जिथे सीबीआय रिमांडची मागणी करणार आहे. यापूर्वी दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने कविता यांना अटक केली आहे. सध्या त्या तिहारमधील तुरुंग क्रमांक 6 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. कविता यांना ईडीने १५ मार्च रोजी अटक केली होती. 26 मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने के. कविता यांची न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली.