शिक्रापूर: कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे संभाजीनगरहून अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी शिक्रापूर येथील पोलीस बंदोबस्तात असलेल्या पार्किंगमध्ये लावून ठेवलेली कार चोरीला गेली. याबाबत पद्माकर नामदेव हिवराळे (वय ३७ रा. जळगाव रोड, संभाजीनगर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.
विजयस्तंभ येथे संभाजीनगरहुन पद्माकर हिवराळे, गौरव हिवाळे, विकी शेजोळे, आदित्य शेजोळे हे त्यांच्या कारमधून आले होते. त्यांनी त्यांची कार शिक्रापूर येथील जित हॉटेल समोरील पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर हिवराळे हे शासकीय बसने अभिवादन स्थळी गेले होते. दुपारच्या वेळी सर्वजण पुन्हा पार्किंगमध्ये आले. त्यावेळी कार चालक पद्माकर हिवराळे याच्या कमरेला कारची चावी नसल्याने दिसले. त्यामुळे सर्वांनी कारची पाहणी केली असता कार देखील तेथे दिसली नाही. त्यामुळे चालकाच्या कमरेची चावी काढून घेत अज्ञात इसमाने कारची चोरी केल्याचे निदर्शनास आले.